बहुआयामी व्यक्तिमत्व - कॅचरुभाऊ राऊत.
गांवकरी २५ मे २००७
  मालेगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाजपाचे जेष्ठ नेते कचरुभाऊ राऊत यांचे नुकतेच निधन झाले वयाच्या १५ व्या वर्षापासून सार्वजनिक क्षेत्रात आपल्या कार्यास सुरूवात केल्यानंतर वयाच्या ८४ व्या वयापर्यंत म्हणजेच अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत राहणारे कचरुभाऊ म्हणजे सर्वांचे तात्या नाशिक जिल्ह्यासह गुजरातच्या डांग भागात सुध्दा त्यांनी आपल्या कार्यकर्तृतवाने दिल्लीपर्यंत आपले नाव अजरामर केले आहे. काम करताना पद असो अथवा नसो, त्याचा विचार न करता तात्या ग्रामपंचायतीत जितक्या सहजतेने वावरत तितक्याच सहजतेने ते मंत्रालय, मंत्री, मुख्यमंत्री ते दिल्ली दरबार जात व कामे करून घेत. त्यांचा जन्म झाला तोच मुळी एका अशिक्षित, गरीब कुटुंबात .९ सप्टेंबर १९२४ रोजी दिंडोरी या आदिवासी तालुक्यातील निगडॉळ या गावात त्यांचा जन्म झाला . ६ बहिणी १ भाऊ असा मोठा परिवार. आदिवासी, अशिक्षित व उपेक्षितांकरिता शिक्षणाचा प्रसार करणारे डांग सेवा मंडळ या मंडळाचे सर्वेसर्वा कर्मवीर कै. दादासाहेब बिडगर. कचरुभाऊंच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक जडणघडणीची सुरुवातच या माध्यमामधून झाली होती. म्हणूंच दादासाहेब बिडगरांच्या निधनानंतर अखेरच्या श्वासापर्यंत तात्या या संस्थेचे अध्यक्ष राहीले व कार्यरत राहीले. त्यांच्या धर्मपत्नी कै. गंगुबाई यांच्या निधनानंतर ते हळवे झाले होते. त्याना घरात एकटेपणा जानवायचा म्हणूंच ते आपल्या सोयिप्रमाने माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यापासून तर विविध क्षेत्रात काम करणार्‍या व भाऊंबरोबर सुख दुखात सहभागी होणर्‍यांना स्वत: च फोन करून चर्चा, विचारविनिमय, गप्पा मारण्यास तास दोन तास बोलवत. त्यांच्या बोलण्यात सद्यस्थितीत चाललेल्या घटनांचा उल्लेख असे. तसेच तेव्हाचे कार्य व आता चाललेले बाजारू राजकारण यावर तात्या पोटतिडकीणे बोलत आजच्या तरुन पिढीने विध्वंसक न होता विधायक कामे निरपेक्ष भावनेने करावी, राजकारणाकडे व्यवसाय म्हणून न पाहता स्वत:चा उद्योग सांभाळून राजकारणाकडे पहावे, असे ते म्हणत. कचरुभाऊंनी सुरुवातीला जनजागृतीचे काम केले. पुर्वी शासन लोकनाट्य व कलापथकाद्वारे समाजप्रबोधन व जनजागृतीचे काम करणार्‍या लोकांना प्रोत्साहनपर मानधन देत भाऊंनी हे काम केले. त्यानंतर स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेऊन अन्यायाविरुद्ध लढण्याचे काम केले. आदिवासींकारिता राबविल्या जाणार्‍या योजनांचा लाभ त्यांना पूर्ण मिळत नसे. कचरुभाऊंनी जनजागृतीद्वारे आदिवासी समाजाला त्यांच्या हक्क व कर्त्यव्याची जाणीव करून दिली माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईकांबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध. त्याचा पुरेपूर फायदा त्यांनी आदिवासींच्या उन्नतिकरिता करून घेतला. एखादे काम अडलेले असेल व संबधित व्यक्ती कॅचरूभाऊंकडे आली तर त्याचा अर्ज घेऊन त्या कागदावर अगोदर मुख्यमंत्री नाईक यांचा काम करावे. असा शेरा व सही घेऊन मगच ते संबंधित खात्याच्या अधिकार्‍याकडे जात असत ते आम्हाला सतत सांगत असत राजकारणात माणसे धनाने मोठी होतात व मनाने छोटी (संकुचित) होतात. राजकारणी जितका धनाने श्रीमंत तितका मनाने लहान. कचरुभाऊंचे या उलट होते. ते मनाने श्रीमंत होते. त्यामुळेच ते पदावर असोत वा नसोत, अखेरपर्यंत गराड्यातच असत. दिंडोरी तालुक्यातील मातेरेवाडी येथील कादवा सहकारी साखर कारखान्याच्या संस्थापकांपैकी तात्या हे एक होते. त्या कारखान्याच्या संस्थापक बोर्डावर त्यांचे नाव आहे. त्याच कारखान्याचा मी आज संचालक आहे. निवडून आल्यानंतर त्यांचे आशीर्वाद मी घेतले. कारखान्याचे नाव खराब होईल असे काम करू नको, असे त्यांनी त्यावेळी मला सांगितले. कचरुभाउंच्या निधनाने एक पोकळी निर्माण झाली आहे. परंतु त्यांच्या शिकवणीनुसार पुढील वाटचाल केल्यास ती निश्चित भरून निघेल.
   
 
   
Copyright © sunilkedar.com . All Right reserved Designed & Hosted by www.nashikfocus.com