शेतकर्‍यानि बँक व्यवहार पूर्ववत सुरुच ठेवावे
गांवकरी, २८ एप्रिल २००८
 

...वरील घोषणेची प्रत्यक्ष अमलबजावणी अद्याप सुरू झालेली नाही. अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या म्हणण्यानुसार २०१२ सालापर्यंत टप्प्याटप्प्याने हा निधी दिला जाईल. हा सर्व प्रकार शेतकार्‍याना कोड्यात टाकणार आहे. अशा परिस्थितीत शेतकार्‍यानी बँकांचे कर्ज भरणे बंद केले तर कालांतराने शेतकर्‍यावर कर्जाचा प्रचंड डोंगर होईल. परिणामी आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ होईल. आजमितीस ज्या शेतकार्‍याना कर्जमाफी योजनेचा लाभ प्रत्यक्ष झाला असा एकही शेतकरी नाही. भविष्यात ज्या शेतकार्‍याना लाभ होईल असे जवळपास २० टक्के शेतकरी आहेत. याचा अर्थ नियमीत कर्ज परतफेड करणारे ८० टक्के शेतकरी आहेत. त्यांचा गुन्हा काय? मुळात कर्जमाफी घोषणा करताना जो लाभ द्यायचा तो सर्व शेतकार्‍याना कमी जास्त प्रमाणात समान न्याय पध्दतिने द्यायला हवा होता. तसे न करता केंद्र सरकारने घाईघाईने, सवंग लोकप्रियता मिळविण्याच्या प्रयत्नात चुकीच्या पध्दतिने कर्जमाफी घोषणा केली आहे. यामुळे ग्रामीण भागात बँकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. असेच जर चालले तर भविष्यात ग्रामीण भागातील बँकाच्या शाखा बंद कराव्या लागतील. जर व्यवहारच होत नसतील तर त्या शाखा शहरामधील सक्षम असलेल्या शाखांमध्ये वर्ग होतील. त्यामुळे करायला गेलो गणपती वा झाला मारुती असे म्हणण्याची वेळ आली आहे. कर्जमाफी घोषणेचे अनिष्ट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर झाले आहेत. प्रचंड वाढलेली महागाई हे त्यापैकीच एक कारण आहे. शेतकर्‍यानी कर्ज परतफेड बंद केल्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल मंदावली आहे. त्यामुळे शेतकरी आणखी अडचणीत येणार आहे. असे होऊ नये म्हणून सर्वच शेतकर्‍यानी बँकांचे व्यवहार सुरुच ठेवावे. किमान कर्ज नूतनीकरण दर महिन्याचे हाफ्ते भरणे हे तर केलेच पाहिजे.

कर्जमफीच्या रकमा पाठविलेल्या याद्यानुसार झाल्या तरी त्या संबधीतांच्या खात्यावर जमा होतील. सध्या ग्रामीण भागात धाबे संस्कृती उदयास आली आहे. कर्जमाफी घोषनेमुळे शेतकर्‍यानी व त्यांच्या मुलानी हुरळून न जाता जल्लोष करणे थांबवावे. वासतवाने भान ठेवणे इष्ट ठरेल. संपूर्ण कर्जमाफी ही अतिशय कठीण बाब असून त्याकरिता दीर्घकालीन पुर्वनीयोजित तरतुदी अर्थसंकल्पात कराव्या लागतील. त्या राबवीताना अर्थसंकल्पावर त्याचे अनिष्ट परिणाम होणार नाहीत याची काळजी घ्यावी लगेल. सद्यस्थितीत अर्थसंकल्पात तरतूद न करता जी कर्जमफीची घोषणा केली आहे ती देशाच्या अर्थव्यवस्थेला तडा देणारी, अडचणीत आणणारी ठरली आहे.
या कर्जमाफी घोषणेची दूरगामी सर्वाना भोगावे लागणार आहेत. ग्रामीण भागास शहरी लोकांना सुध्दा त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. अशा परीस्थीतीत शेतकर्‍यानी धूर्त राज्यकर्त्यांवर विश्वास ठेवू नये त्यात अशा राज्यकर्त्यांचे काहीच नुकसान होणार नाही. झालेच तर तोटे व नुकसान सर्वसामण्यासह शेतकरी व शेतमजूरांचेच होणार आहे. म्हणूनच शेतकर्‍यानी याचा सांगोपांग विचार करावा. फसव्या घोषणा देऊन सत्ताप्राप्ती करणे याची आता राज्यकर्त्याना सवय झाली आहे. त्यावर विश्वास न ठेवता आपापले नित्य व्यवहार सरूच ठेवावेत. सरकारने कर्जमाफी व कर्ज सूट देण्याकरिता याद्या व माहिती मागविली आहे. संबधित अर्थसंस्थानी त्या पाठविल्या आहेत. आपले कर्ज खाते बंद झाले तरी किंवा आपण ३१ डिसेंबर २००७ नांटेर्च्या कर्ज थकबाकीमधून बाहेर आलो तरी पाठविलेल्या याद्याप्रमाणे होणारा फायदा शेतकर्‍याच्या पदरात पडेल. पारंतू त्यामुळे बँकिंग व्यवहार बंद न करता ते व्यवहार सुरुच ठेवावेत. कर्ज भरताना कर्जमाफी योजनेचा येणारा लाभ आमच्या खात्यावर जमा करावा अशा प्रकारचे बँकाणा पत्र देऊन पोहोच घ्यावी. त्यातच आपले कल्याण असेल.

 
   
Copyright © sunilkedar.com . All Right reserved Designed & Hosted by www.nashikfocus.com