भ्रष्ट्राचाराला सहकारात थारा नसावा
गांवकरी, २/ ११ / २००७
  गैरव्यवहार होत असलेल्या साखर कारखान्याची अंतिम जबबदारी चेअरमन व संचालक यांचीच आहे व जर त्याना त्यातले काही समजत नसेल तर त्यांनी निवडणुकीत संचालक होण्याचा अट्टहास का धरावा? वीना सहकार नही उध्दार या ऐवजी जर वीना स्वाहकर नाही स्वतःचा उध्दार असे जर काही नेतेमंडळी वागत असतील तर त्यांना खड्यासारखे बाजूला केले पाहिजे. धरल तर चावत व सोडल तर पळत अशी गत आज शेतकार्‍याची झाली आहे. म्हणजे भाजीपाला. पिके ध्यावी तर भाव मिळत नाही. उस लावावा तर कारखाने उत्पादक खर्च वजा जाता थोडा नफा होईल इतका भाव देत नाही. द्राक्षे लावावी तर व्यापारी फसवतात. अन्नधान्य पिकवावे तर दलाल कमी भावात खरेदी घेऊन लुबड्णूक करतात. शेतमालाची विक्री मार्केट कमिटीमार्फत केल्यास कमिटी शेकडा सात टक्के कमिशन शेतकर्‍याच्या पैशामधून घेतात. अशा परिस्थितीत उस हेच आशादायक पीक वाटते. परंतु त्याकरिता साखर कारखान्यानी उस उत्पादाकांना जास्तीत जास्त भाव दिला पाहिजे. साखर कारखाने म्हणजे चराऊ कुरण न समजता सेवाभावीवृत्तीने संचालकांनी काम केल्यास निश्चितच शेतकरी सुखी होईल. त्याकरिता महाराष्ट्रातील चांगल्या रीतीने कामकाज करीत असलेल्या साखर कारखान्यांचा अभ्यास केला पाहिजे. उदा. कागल येथील शाहू साखर कारखान्याने शेतकर्‍याना ऊसाला १८०० रु. भाव दिला आहे. तर याउलट काही कारखान्यांनी ८५० रु. भाव दिला आहे. यापुढे ते भाव देऊ शकत नाही अशी त्यांची परिस्थिती आहे. जर महाराष्ट्रात एक कारखाना ऊसाला १८०० रु. भाव देतो व इतर कारखाने ८०० रु. भाव देतात तर निश्चितच काही तरी गडबड घोटाळे आहेत. असे म्हणायला हरकत नाही. याचे कारण शोधतांना अनेक गमतीशीर घटना घडलेल्या आहेत. सर्वसामान्य शेतकर्‍याने दरवर्षी फक्त तुमच्या साखर कारखान्याचा साखरेचा प्रती किलो उत्पादन खर्च किती हे तपासावे. शाहू साखर कारखान्याचा प्रती किलो उत्पादन खर्च ३.५७ पैसे आहे, तर तोच खर्च इतर भाव न देऊ शकणार्‍या कारखान्यांचा ९ रु. ते १४ रु. आहे.

वरीलप्रमाणे जर होत असेल तर शेतकर्‍याचे कसे भले होईल. कमीत कमी उत्पादन खर्चात जर साखर, इथेनॉल, डिस्टिलरी कागद, वीज प्रकल्प चालविले तर निश्चितच त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उस उत्पादक शेतकरी सुखी होईल. १५ वर्षापूर्वी निफड कारखाण्यास १० कोटी नफा होता. तर आज या साखर कारखान्यावर १३७ कोटी कर्ज तसेच तोटा ८० कोटी आहे. याचे कारण कारखान्यांनी वर्षभरात कसा कारभार केला याचे मोजमाप म्हणजे साखरेचा प्रती किलो उत्पादन खर्च होय ढोबळमानाने तेवढे पाहिले तरी सभासदांचा संचालक व चेअरमनवर वचक राहील. परंतु एकदा निवडून गेल्यावर पाच वर्षे सत्यानाश होईपर्यंत जर सभासदांनी लक्ष दीलेच नाही तर मग त्याची परिणती कादवा व निफाड कारखान्यांमध्ये झालेले साखर घोटाळे व भ्रष्टाचारात होते.

महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात परळी येथील वैजनाथ सहकारी साखर कारखाना सभासद शेतकर्‍याना भागभांडवलावर लाभांश देतो तर त्याचवेळी इतर कारखाने तोट्यात जाऊन बंद का पडतात याचा विचार केला पाहिजे. नाशिक जिल्ह्यातील रानवड कारखाना बंद अवस्थेत भाडेतत्वावर घेऊन चालविला जातो तर इतर काही कारखाने अडचणीत येतात त्याचासुध्दा संचालकांना जाब विचारला पाहिजे. प्रत्येक वर्षी ऑडिट केले पाहिजे. उदा. एक टन ऊसतोड करण्यास दिवसाला दोन माणसे लागतात तर गेल्या वर्षी कारखान्यामार्फत किती टन ऊस गाळप झाला व त्याकरिता किती मजूर लागले, प्रत्येक संचालकाने अहवाल काळात कारखान्याच्या वाहनांचा किती व कोठे वापर केला याचा खुलासा असावा. नाही म्हणायला योग्य कारणासाठी प्रवास व्हायलाच पाहिजे. परंतु जर प्रत्येक संचालकाच्या घरी व वैयक्तिक कारणांसाठी वाहनांचा सर्रास वापर होत असेल तर ते थांबले पाहिजे. प्रत्येक संचालक काम करताना आपण भ्रष्टाचार केला, चुकीचे काम केले तर हजारो शेतकरी कुटुंब उद्ध्वस्त होतील, याचा विचार करावा, टेंडर, खरेदी-विक्रीचे व्यवहार पारदर्शक व्हावे कारखाना चालविताना शेतकरी हिताचाच विचार डोळ्यासमोर ठेवून काम केले पाहिजे

गैरव्यवहार होत असलेल्या साखर कारखान्याची अंतिम जबाबदारी चेअरमन व संचालक यांचीच आहे व जर त्यांना त्यातले काही समजत नसेल तर त्यानी निवडणुकीत संचालक होण्याचा अट्टहास क धरावा ? वीणा सहकार नाही उध्दार याऐवजी जर वीना स्वाहकार नाही स्वतःचा उध्दार असे जर काही नेतेमंडळी वागत असतील तर त्यांना खाड्यासारखे बाजूला केले पाहिजे. शेवटी कोंबडा पाटिखाली डांबून ठेवला तरी पहाट होताच अरवतो. त्याप्रमाणे भ्रष्टाचार करणारा ओळखला जातोच. अशा व्यक्तीना सहकारात थारा नसावा आजमितिस सहकारी बॅंका, पतसंस्था, साखर कारखाने या भ्रष्टाचाराचे अड्डे झाले आहेत. नाही म्हणायला काही चांगल्या पध्दतीने काम करणार्‍या सहकारी संस्था आहेत. परंतु त्यांच्याकडेसुध्दा दुषित नजरेने पहायचा काळ वाढत चालला आहे. विखे पाटील, विठठलराव गाडगीळ यांनी ज्या उदात्त हेतूने व साखर कारखान्याच्या माध्यमामधून शेतकर्‍याचे कल्याण होईल, असे काम केले. अशा थोरांचे अनुकरण करून भविष्यात जे लोक (संचालक) चांगले काम करतील अशाच व्यक्तींच्या हातात कारखान्याची सूत्रे द्यावी म्हणजे पुढील पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही

   
 
   
Copyright © sunilkedar.com . All Right reserved Designed & Hosted by www.nashikfocus.com