भाजपच्या शहराध्यक्षांवर उपमहापौरांकडून स्तुतिसुमने
७ जून २०१२
 

बरं झालं.... लक्ष्मण सावजी यांना भाजपच्या शहराध्यक्षपदी रिपीट केल. संघटनेच्या स्तरावरील कार्यक्रम छान झाले... उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी संघटनमंत्री डॉ. राजेंद्र फडके यांच्या साक्षीने स्तुतिसुमने उधळली. आज दुपारी ढगाळ हवामानाच्या साक्षीने झालेल्या पर्यावरणाविषयक कार्यक्रमात हा साक्षात्कार कार्यकर्त्यांना झाला. मग मात्र सरचिटणीस सुनील केदार यांनी त्यास जबरदस्त तडका दिला. नाना सावजींवर प्रसन्न झाले, हे कसं? हा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात तयार झाला होता. अखेर श्री. केदार यांनी आज प्रा. सुहास फरादें आणि विजय साने हे दोघे नसल्याने नाना खरे बोलले, असे सांगताच उपस्थितांमधे हशा पिकला. स्वत: नानांनीही त्यास हसून दाद दिली. शहराध्यक्षपदाच्या निवडीवेळी पक्षांतर्गत झालेल्या मोर्चेबांधणीला पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमानिमित्त वाचा फुटल्याचे कार्यकर्त्याना जाणवले. श्री. कुलकर्णी यांनी याच कार्यक्रमात शहराध्यक्ष्यांच्या आग्रहानुसार प्रत्येक मंगळवारी सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत आपण पक्ष कार्यालयात उपस्थित राहणार असल्याचे जाहीर केले. तसेच, माजी महापौर बाळासाहेब सानप यांच्याप्रमाणेच आता वृक्षदींडी काढून दोन लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याचेही उपमहापौरांनी सांगितले.

 
   
Copyright © sunilkedar.com . All Right reserved Designed & Hosted by www.nashikfocus.com