डाव्या पक्षांचे आंदोलन म्हणजे निव्वळ दुटप्पीपणा
  कम्युनिस्ट पक्षाचे नेते ए. बी. वर्धन यांनी केंद्रातले यु. पी. ए. सरकार महागाई कमी करण्यात अपयशी ठरल्याबद्दल देशव्यापी आंदोलने करण्याचे ठरवले आहे. वास्तविक डाव्या पक्षांनी एकीकडे केंद्रात कॉँग्रेसबरोबर सत्तासुंदरीचा उपभोग घ्यायचा व दुसरीकडे आपल्याच सहयोगी पक्षाच्या विरोधात महागाईबद्दल आंदोलने करायची हा दुटप्पीपणा होय. ही तमाम भारतीय जनतेची शुध्द फसवणूक आहे. जर डाव्या पक्षांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांची तळमळ आहे, तर एक तर त्यांनी कॉँग्रेसला तसे निर्णय घ्यायला भाग पाडावे किंवा सत्तेतून बाहेर पडावे परंतु जनतेची फसवणूक करू नये.
केंद्रात डव्यांसह यु. पी. ए. सरकार सत्तेवर आले. तेव्हाच डाव्या पक्षांचा हा आसंगाशी संग झाला असे वागले होते. आता प्रत्यक्षात ते अनुभवास येत आहे. एकीकडे यु. पी. ए. सरकारला छुप्या रीतीने पाठिंबा द्यायचा व दुसरीकडे ओरड करायची, असा दुटप्पि गनिमी कावा पक्ष खेळत आहे. सत्ताही त्यांचीच व आंदोलनेसुद्धा तेच करताता. हे कोणत्या राजनीतिमध्ये बसते? याचा अर्थ डावे पक्ष सर्वसामान्य जनतेला वेड्यात काढत आहेत. देशात रॉकेल पेट्रोल डिझेल गॅस अदिसह जीवनावाश्यक वस्तुंचे भाव गगनाला भिडत आहेत. या सर्व वस्तूंचा सर्रास काळाबाजार होत आहे. सत्तेतलेच लोक काही अधिकार्‍यांच्या संगनमताने भ्रष्टाचार व काळाबाजार करीत आहेत. अशा परिस्थितीत डाव्यांना आपल्याच सरकारविरोधात आंदोलन करण्याचा काय अधिकार?
सर्वसामान्य जनता महागाई, भ्रष्टाचार, कर्जबाजरिपाणा यामुळे त्रस्त झाली आहे. देशात यापूर्वी अटलजिंच्या सत्ताकाळात सर्व जीवनावश्यक वस्तुंचे भाव स्थिर होते. रस्तेविकासाची कामे देशभर वेगाने सुरू होती. लाल फितीमध्ये फाईल आडत नव्हती; परंतु दुर्दैवाने ही विकास कामे सर्वसामान्या लोकांपर्यंत न पोहचल्यांमुळे, तसेच मतदारांची मतदानाची मानसिकता होण्यापूर्वीच मुदतपूर्व निवडणुका झाल्यामुळे केंद्रात अटलजिंच्या सरकारचा पराभव झाला. एक तर भारतात स्वातंत्रप्राप्तीपासून कॉँग्रेस सरकार सत्तेत होते, त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते, नेते मंडळी, मंत्री, हितचिंतक, काही ना काही आर्थिक लाभाच्या ठिकाणी वर्नि लागलेल्या होत्या.
निवडणुकींत पैसा ओतने व निवडून आल्यावर पैसे लुटणे हे तंत्र कॉँग्रेससह सगळ्याच पक्षांचे सुरू झाले आहे व त्याचाच दुष्परिणाम भारतीय राजकारणावर होत आहे.
 
   
Copyright © sunilkedar.com . All Right reserved Designed & Hosted by www.nashikfocus.com