शहरात कायदा - सुव्यवस्था वार्‍यावर
भाजपाचा आरोप : नाशिक्करांमध्ये दाहतीचे वातावरण
लोकमत, १८ जुलै २०१४
 

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी व मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा येथे सहा दुकाने फोडून ट्राकने मालाची चोरी झाल्याची घटना व शहरातील विविध उपनगरांमध्ये सुरू असलेल्या यावरून कायदा सुव्यवस्था वार्‍यावर असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टी केला असून, चोरटयांना पोलिसांचेच अभय असल्याचेही भाजपने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

शहरातील बहुचर्चित केबिसी घोटाळा, त्यापाठोपाठ शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजावर चोरटयांनी फोडलेली सहा दुकाने, चार दिवसांपूर्वी हनुमानवाडीत फोडलेली तीन दुकाने, विविध उपनगरांमध्ये होत असलेल्या घरफोड्या आदी गुन्हेगारीच्या घटनांमुळे शहरातील नागरीकामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे भाजपा ने म्हटले आहे. सायंकळ नंतर घराबाहेर पडावे की नाही अन् घराबाहेर पडूनही सुरक्षित राहू की नाही, असा प्रश्न नाशिककारांना पडला आहे. पोलिस खाते व गृह विभाग राज्य सरकारच्या नेत्यांची उठबस करण्यातच व्यस्त आहे. शहरात 'हप्ता राज' सुरू झाले असून, रस्त्याने ये-जा करणार्‍या प्रत्येक वाहनचालकांना अडविले जात असून, या ना त्या कारणाने त्रास दिला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. शहरात राजरोस सुरू असलेल्या खून, दरोडे, लूट, गैरव्यवहार, बलात्कार आदी घटनांमुळे शहरात पोलिस खाते कार्यरत आहे की, नाही असा सवाल नागरिकांना उपस्थित केला आहे. परराज्यातुन रामकुंदावर येणार्‍या भाविकांचीही सर्रासपणे लूट केली जात असून, त्यामुळे पराराज्यात नाशिक शहराबाबत चुकीचा संदेश जात असल्याचेही पत्रकात म्हटले आहे. यासाठी गृह विभागाने नाशिकला तरुण व कर्तव्यदक्ष पोलिस आयुक्त द्यावा आणि सेवानिवृत्तीला आलेल्या अधिकार्‍यांना पाठविण्याची परंपरा बंद करण्याचीही मागणी भाजपाने केली आहे.(प्रतिनिधी)

 
   
Copyright © sunilkedar.com . All Right reserved Designed & Hosted by www.nashikfocus.com