'मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करणार'
गांवकरी, रविवार, ६ एप्रिल २००८
  शेतकर्‍याना रिंगन करून मारहाण होण्यास गुंड व पोलिसांमधील युती कारणीभूत असुन या प्रकरणी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कादवा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील केदार यांनी दिली.
नाशिक बाजार समिती मधील शेतकर्‍यावर होत असलेल्या अत्याचाराबाबत श्री. केदार यांनी स्पष्टपणाने काही मुद्दे मांडले आहेत. त्यानी मांडलेल्या निवेदनात म्हटले आहे, की बाजार समितीत शेतकर्‍याची लुटमार होण्याचे प्रकार थांबवले नाहीत; मात्र बाजार समिती व पोलिस बघ्याची भूमिका घेत आहेत. गुंडगीरी, चोरांचे आश्रयस्थान आणि वैश्या व्यवसाय याचे आगार म्हणून पंचवटी व पेठरोडचे मार्केटयार्ड ओळखले जाते. हप्तेबाजिमुळे पोलिसदेखील संशयाच्या भोवर्‍यात सापडले असून शेतकर्‍यानी तशा लेखी तक्रारी केल्या आहेत. पोलीसच सक्षम नसल्याने शेतकरी भयभीत झाले असून मार्केट कमिटीचे संचालक व कर्मचारी डोळ्यांवर पट्ट्या बांधून काम करीत आहे. शेतकर्‍याच्या हिताच्या गप्पा मारणार्‍या संचालकांनी आणि पंचवटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक कल्याणकुमार लवंगे यांनी यार्डमध्ये फिरून शेतकर्‍याच्या व्यथा जाणून घ्यायला हव्यात यासंदर्भात आता मानवी हक्क आयोगाकडे आम्ही तक्रार दाखल करणार आहोत; मात्र मार्केटमधील गुंडशाही आता संचालकांनाच थांबायची नसल्याचे स्पष्ट झालेले आहे. प्रवेशकर, कमिशन, सुलभ शौऊच्यालय, वहानतळ असे विविध कर शेतकर्‍याकडून पठाणी पध्दतीने वसूल केले जात आहे.
शेतकर्‍याकडून पैसे उकळून त्यांच्या शेतमालाची व वाहनतील साहित्याची चोरी करणार्‍या गुंडांना संचालक आणि कर्मचार्‍याचा पाठिंबा असल्याचे निवेदन राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील याना पाठविण्यात आले आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, नाशिक मार्केटमधील गुंडगीरी थांबवावी, गैरव्यवहारची चौकशी करावी, संचालक व कर्मचार्‍यावर मानवी हक्काचे उल्लंघन होत असल्याबद्दल गुन्हे दाखल करावेत, पोलिसांच्या बदल्या करून चौकशी करावी, अशा मागण्या भाजपाणे केल्या आहेत. समितीतील अत्याचार न थांबल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
   
 
   
Copyright © sunilkedar.com . All Right reserved Designed & Hosted by www.nashikfocus.com