मोफत अंत्यसंस्काराची घोषणा स्वागतार्ह !
  नाशिक महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती विजय साने यांनी दि. १५ फेब्रु. २००३ पासून नाशिकमध्ये मोफत अंत्यसंस्काराची घोषणा करून चांगला पायंडा पडला आहे. गरीब व सर्वसामान्य नागरिकांना यापुढे सुखाचे जगणे नशिबी नसले तरी निदान सुखाचे मरण येईल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या उपक्रमामुळे गोरगरीब, सर्वसामान्य लोक निश्चितच दुवा देतील. यापुढे मनपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी असेच लोकोपयोगी धोरणे राबवावी. नाशिक मनपा पुर्वी सुशिक्षित गुंडाचा आड्डा बनला होता. राजीव गांधी भवन विविध बँकाकडून रोखे काढून गहाण होते.
नाशिकचे वैभव असलेले हे भवन लिलावात निघते की काय अशी शंका येऊ लागली होती. परंतु भाजप-शिवसेना युतीचा . सत्ता आली व आयुक्त कृष्णाकांत भोगे, महापौर दशरथ पाटील, स्थायी समिती अध्यक्ष विजय सोने, उपमहापौर शोभताई आहेर व सर्व नगरसेवकांनी लोकहिताचे निर्णय घेतले. अत्यावश्यक कामांना प्राधान्य देऊन अनावश्यक कामे बंद केली. अनाठायी खर्चास कात्री लावली. या दरम्यान आयुक्त व लोकप्रतिनिधींमध्ये तात्विक मुद्यावरुन संघर्ष झाले; परंतु ते तेथेच मिटले. आयुक्त व लोकप्रतिनिधींनी एकत्ररित्या लोकहिताचे निर्णय घेतल्यामुळे नाशिकचा चांगला चेहरा लोकांना दिसू लागला. रस्ते रुंदीकरण, आतीक्रमन ., वृक्ष लागवड, रस्ते, चौक व दुभाजके सुशोभीकरण यामुळे नाशिकच्या सौंदर्यात भर पडली.
नाशिक मनपाने मोफत अंत्यसंस्कार योजना जाहीर करून संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श निर्माण केला. याच प्रकारे यापुढे घरपट्टी, पाणीपट्टी, विविध कर आकारणी हे माफक ठेवावे मनपाचे उत्पन्न इतर मार्गांनी वाढवून नागरिकांना, अल्प उत्पन्न असलेल्या कामगार वर्गाला कमी पैशात नाशिकमध्ये चांगल जीवन जगता येईल यादृष्टीने प्रयत्न करावे. घरपट्टी आकारताना काही वेळा भाडेकरी असल्यास अधिकारी कोणताही विचार न करता भाड्यापेक्षा जास्त रकमेची घरपट्टी आकारतात, त्याचाही विचार करावा. घरमालक घर बांधतांना कर्ज घेऊन बांधतात. त्यामुळे ते काही प्लॅट, खोल्या भाडेतत्वावर देऊन कर्जाची तोंडमिळवणी करतात. त्यातच घरपट्टी जास्त आल्यास धसका बसतो, पर्यायाने भाडेवाढ होते. व तो भार सामान्य भडेकरूला परवडणारा नसतो. मनपाने फाळके स्मारक उभारून प्रवेश फी, कॅण्टीनच्या रूपाने उत्पन्नात मोठी वाढ केली. अशाच प्रकारे वॉटरपार्क, संस्कृतिक उद्दाने व कार्यालये उभारून इतर मार्गाने उत्पन्न वाढवून सर्वसामान्यांना दिलासा देणारे निर्णय घ्यावे. म्हणजे खर्‍या अर्थाने शिवशाही अवतरली असे म्हणता येईल.
 
   
Copyright © sunilkedar.com . All Right reserved Designed & Hosted by www.nashikfocus.com