जनसामान्यांचा नेता-गोपीनाथ मुंडे
  एखाद्या माणसांच व्यक्तिमत्व चौफैर असत. कुठल्याही क्षेत्रात ही माणसे उच्च स्थानावर असतात. फारच थोड्यांना हे भाग्य लाभत. गोपीनाथ मुंडे यांच्या बाबतीत मात्र हा भाग्याचा वरदहस्त आहे. असाच म्हणावे लागेल. ज्या क्षेत्रात गोपीनाथजींनी डोकवले तेथे त्यांच्या कर्तुत्वचा ठसा उमटल्याशिवाय राहिला नाही. जेथे त्यांनी पाऊल टाकले, त्या पावलाबरोबर यशात पाऊल टाकले. कारण ते पाऊल असते विचारांच, यामागे असतो गाढा अभ्यास आणि अधिक महत्वाचे म्हणजे असतो आक्षम्या आत्मविश्वास व एकाग्रता, एखाद्या माणूस त्यांच्या मनाला भावला, पटला की त्यांच्यातील कुशल संघटक जागा होतो. जरूरिप्रमाणे चांगला व कठोर नीर्णय घेण्यात त्यांची हातोटी आहे. कुठलाही निर्णय पूर्ण विचारांनी व परिणमांची सर्व तयारी करून घेतलेला असतो.
राजकारणातील अस्थिरता चढउतार, राजकीय भविष्याच्या अंधार्‍या कुशीत काय दडलय? अनेक त्या काळात सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आंदोलने उभी केली. मग तो दुष्काळाचा प्रश्न असो, शेतकर्‍याचे कर्जमफीचे आंदोलन असो किंवा मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यासंबंधीचे आंदोलन असो या सर्व आंदोलनाचे नेतृत्व स्वत: गोपीनाथरावांनी केले. व आंदोलने यशस्वी करून दाखविली आणि भाजपाला सर्वसामान्यांची पार्टी म्हणून मान्यता मिळवून दिली.
जि.प. सदस्य, आमदार, पक्षाचे अध्यक्ष, विरोधिपक्ष नेते, माजी उपमुख्यमंत्री ही त्यांच्या यशाची कमान १९७४ पक्षवाढीसाठी व जनसमर्थनासाठी सर्वाधिक वापर करून घेतला. अनेक प्रश्न अभ्यासपूर्ण पध्दतीने मांडून, विरोधी पक्षनेत्यांची स्वतंत्र प्रतिभा निर्माण केली. त्यांनी विरोधी पक्षनेता असताना काढलेल्या शिवनेरी ते शिवतीर्थ या संघर्ष यात्रेमुळेच राज्यात सत्ता परिवर्तन होण्यास मदत झाली. गोपीनाथराव उपमुख्यमंत्री म्हणून अत्यंत यशस्वी झाले. त्यांनी गुन्हेगारीकरनावर अंकुश लावला. वीजनिर्मिती वाढविण्यावर भर दिला. सर्व खात्यांना मार्गदर्शन करून, रचनात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता त्यांच्यात आहे. प्रशासन पध्दतीवर त्यांनी एक वेगळी छाप पाडली आहे. तसेच सरकार समोरील समस्यांचे समाधान करण्यात त्यांनी प्रावीण्य मिळवले आहे. मुंडे यांनी प्रशासनावर चांगली पकड बसवली आहे. उत्कृष्ट प्रशासक होण्यासाठी समस्यांचा अभ्यास, स्वत:चे मत, प्रशासकीय यंत्रणेवारील पकड, योजनेच्या अमलबजावणीतील उणीवा दूर करणे, लभार्थिशी संपर्क साधने, योजनेच्या अमलबजावणीसाठी साधनांची जुळवाजुळव करून ती योजना यशस्वीरित्या राबविणे याबाबत गोपीनाथ मुंडे यशस्वी झाले आहेत.
   
  महाराष्ट्राचे भाग्य
 

राज्यातील युती शासनाच्या कालावधीतील त्यांची यशस्वी कारकीर्द विलक्षण प्रभावी व यशस्वी ठरली आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था सलोखा कायम ठेवण्यासाठी त्यांना अनेक धर्मसंकटंना सामोरे जावे लागेले, परंतु त्यांच्या ठाम भूमिकेमुळे ते त्यात यशस्वी झाले. त्यांची यशस्वी कारकीर्द आजही राज्यातील जनतेच्या स्मरणात कायम स्वरूपी ताण मांडून बसली आहे. एका बाजूला नेतृत्व व युती तर दुसर्‍या प्रचंड जनमत. अशा स्थितीत न्याय कोणाला द्यायचा याचा निर्णय ते ठामपणे घेतात. ज्या कारणासाठी आपण संघर्ष केला. त्याच्यासाठी सत्तेचे व पक्षीय राजकारण करून जनतेचा विश्वासघात करावयाचा नाही ही त्यांची भूमिका असते. जे समाजासाठी आवश्यक आहे ते करताना राजकीय जोखीम स्वीकारण्याची त्यांची मानसिक तयारी असते. याच कारणांमुळे व धोरणांमुळे गृहमंत्री पदावर असतांना त्यांनी राज्यातील पोलिसांचे मनोधैर्य वाढविले. कुप्रसिध्द गुंडांना कंठस्नान घातले. गुंडांना शरण जाणारा पोलिस आता गुंडांना धारतीर्थी लोळवत आहे. पोलिस तेच आहे बदलला होता गृहमंत्री व त्यांनी दिलेला आत्मविश्वास गर्दीत लोकप्रिय असणारा नेता, धाडसी अधिकारी वर्गात लोकप्रिय झाला हे महाराष्ट्राचे भाग्य आहे.

   
  आ. मुंडे यांच्या नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज
 

भारतीय जनता, पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आ. गोपीनाथराव मुंडे म्हणजे भाजपा पक्षातला झंझावात व तरुणांना स्फूर्ती देणारे टॉनिकच म्हणावे लागेल. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री असताना गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरलेले मुंडे म्हणजे गंडांच्या टोळ्यांना ते धनाजी वाटत, कर्तव्य तत्परता, अचूक निर्णयक्षमता, कार्यकर्त्यांची नावासह ओळख, समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील, प्रवहातील व्यक्तींना आपलेसे करणे, स्पष्टवक्तेपणा आदी गुणांमुळे मुंडे हे भाजपाचे सर्वसामान्य नेतृत्व झाले आहे.
आ. मुंडे यांचे दुष्काळी दौरे, नागपूर मोर्चे, गाव चलो अभियान, संघर्ष यात्रा, पक्ष गौरव निधी, इतर राजकीय पक्षातील जनमत असलेल्या नेत्यांना आपलेसे करून भाजपात आणणे, आदी गोष्टींचा खास करून उल्लेख करावा लागेल. १२ डिसेंबर १९४९ हा मुंडे यांचा जन्मदिन. परंतु वाढदिवस साजरा करू नये या मताचे ते आहेत. महाराष्ट्रात सध्या जातीय दंगली, बेरोजगारी, संघटित गुन्हेगारी, सहकार क्षेत्रातील भ्रष्ट्राचार, तेलगी स्टॅम्प पेपर व बनवट नोटांचा घोटाळा, नाशिकमध्ये सापडलेला महाराष्ट्रासह ८ देशांचा प्रचंड चलन साठा, हिंदू मुस्लिम दंगली, राजकीय बेबनाव, सर्व सामन्यांचा राज्यकर्त्यांवरील उडत चाललेला विश्वास अशा अनेक समस्यांनी जर्जर झालेल्या महाराष्ट्राला आज खंबीर, धडाडीचे नेतृत्व म्हणून गोपीनाथराव मुंडे यांच्याकडे पाहण्याची गरज आहे.
राज्यात साखर कारखनदारी अधोगतिला जात असताना मुंडे यांनी स्वत: साखर कारखाना उभारून अतिशय कमी खर्चात काटकसर करून आदर्श निर्माण केला. मुंडे यांनी उसापासून इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प उभारून उस उत्पादाकांना जास्त भाव मिळण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल टाकले आहे. विशेष म्हणजे १५ कोटीचा हा प्रकल्प काटकसर करून मुंडे यांनी १४ कोटी मध्येच सुरू केला. याउलट १९७८ साली शरद पवार यांनी त्यावेळी १४ कोटी मध्ये उभारला जाणारा साखर कारखाना प्रॉजेक्ट कॉस्ट वाढवून ४२ कोटीवर नेला. असे एकाच वेळी २७ कारखान्यांना त्यांनी परवानगी दिली म्हणजे १९७८ साली प्रत्यक्ष उभारणीच्या वेळी हे २७ कारखाने ७५६ कोटीचे अतिरिक्त कर्ज घेऊन उभे राहीले व आज ते अती तोट्यात जाऊन बंद पडले आहे.

मुंडे यांना दूरदृष्टिकोन ठेऊन विधायक हेतूने पाहण्याचा दृष्टिकोन यावरून दिसून येतो. स्पष्टवक्तेपणा व हजरजबाबीपणामुळे ते लोकप्रिय आहेत. पक्षात वावरताना ते सत्तेईतकेच महत्व संघटनेला देतात. त्यांच्या मते ज्या पक्षांची संघटना (घर) मजबूत तो पक्ष सत्त्तेवर येण्यास अडचण येत नाही. आज त्यांची राजकीय वाटचाल योग्य रीतीने सुरू आहे. थोडक्यात पंडित दिनदयाळ उपाध्याय यांनी सांगितल्याप्रमाणे ' विचारांना राष्ट्रहिताचे अधिष्ठान असेल तर आपली राजकीय भूमिका कधीच चुकणार नाही. याप्रमाणे गोपीनाथराव मुंडे यांची राजकीय वाटचाल सुरू आहे.

 
   
Copyright © sunilkedar.com . All Right reserved Designed & Hosted by www.nashikfocus.com