गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज
  ... मुंडे यांचे दुष्काळदौरे, नागपूर मोर्चे,गाव चलो अभियान, संघर्ष यात्रा, पक्ष गौरव निधी, इतर राजकीय पक्षांतील जनमत असलेल्या नेत्यांना आपलेसे करून भाजपात आणणे आदी गोष्टींचा खास करून उल्लेख करावा लागेल. त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय जीवनात सर्वाधिक दौरे करणारे व सर्वाधिक वेळ घराबाहेर राहिलेले नेते म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल. १२ डिसेंबर १९४९ हा मुंडे यांचा जन्मदिन; परंतु वाढदिवस साजरा करू नये या मताचे ते आहेत. महाराष्ट्रात सध्या जातीय दंगली बेरोजगारी, संघटित, गुन्हेगारी, सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार, तेलगी स्टॅंप पेपर व बनावट नोटांचा घोटाळा, नाशिकमध्ये सापडलेला महाराष्ट्रासह ८ देशांचा प्रचंड चलन साठा, हिंदू-मुस्लिम दंगली राजकीय बेबनाव, सर्वसामान्यांचा राज्यकर्त्यांवरील उडत चाललेला विश्वास, राजकीय बेदीली अशा अनेक समस्यांनी जर्जर झालेल्या महाराष्ट्राला आज खंबीर धडाडीचे नेतृत्व म्हणून गोपीनाथराव मुंडे यांच्याकडे पाहण्याची गरज आहे.

राज्यात साखर कारखनदारी अधोगतीला जात असताना मुंडे यांनी स्वत: साखर कारखाना उभारून अतिशय कमी खर्चात काटकसर करून आदर्श दाखविला. तसेच दुसरा तोट्यात, बंद स्थितीत चाललेला कॉँग्रेस नेत्यांचा गोदा-दुधना साखर कारखाना स्वता:च्या ताब्यात घेऊन योग्य नियंत्रणामुळे उर्जितावस्थेत आणला. मुंडे यांनी उसापासून इथेनॉल निर्मितिचा प्रकल्प उभारून उस उत्पदकंणा जास्त भाव मिळण्याच्या दृष्टीने आणखी एक नवे पाउल टाकले आहे. विशेष म्हणजे १५ कोटींचा हा प्रकल्प काटकसर करून मुंडे यांनी १४ कोटीमध्येच सुरू केला. याउलट १९७८ साली शरद पवार यांनी त्यावेळी १४ कोटीमध्ये उभारला जाणारा साखर कारखाना प्रॉजेक्ट कॉस्ट वाढवून ४२ कोटींवर नेला. असे एकाच वेळी २७ कारखान्यांना त्यांनी परवानगी दिली. म्हणजे १९७८ साली प्रत्यक्ष उभारणीच्याच वेळी हे २७ कारखाने ७५६ कोटींच्या अतिरिक्त कर्ज घेऊन उभे राहीले व आज ते अतीतोटयात जाउन बंद पडले आहेत.
मुंडे यांनी दूरदृष्टी ठेवून विधायक हेतूने पाहण्याचा द्रष्टिकोन यावरून दिसून येतो. स्पष्टवक्तेपणा व हजारजबाबिपणा यामुळे ते लोकप्रिय आहेत ते पक्षात वावरताना सत्तेईतकेच महत्व संघटनेला देतात. त्यांच्या मते ज्या पक्षाची संघटना (घर) मजबूत, तो पक्ष सत्तेवर येण्यास अडचण येत नाही.

आज त्यांची राजकीय वाटचाल योग्य रीतीने सुरू आहे. पंडित दिणदयाळ उपाध्याय यांनी सांगितल्याप्रमाणे "विचारांना राष्ट्रहिताचे अधिष्ठान असेल, तर आपली राजकीय भूमिका कधीच चुकणार नाही" याप्रमाणे गोपीनाथराव मुंडे यांची राजकीय वाटचाल सुरू आहे. त्यांच्या जन्मदिनी त्यांच्या भावी वाटचालिस शुभेच्छा

 

 
   
Copyright © sunilkedar.com . All Right reserved Designed & Hosted by www.nashikfocus.com