नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाची देशाला गरज
 

गुजरात राज्याचे देशातले सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची नुकतीच भारतीय जनता पक्षाच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. गोवा येथे भाजप कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीला व त्या नंतरच्या सभेला उपस्थीतीचा उत्साह इतका अमाप होता की भाजपच्या आगामी २०१४ साली होणार्‍या लोकसभा निवडणूकांकरिता त्यांचे नाव पुढील पंतप्रधानपदाकरता जाहीर करावे, असा मतप्रवाह होता. हा मतप्रहाव फक्त गोव्यातच होता असे नाही तर संपूर्ण देशभरातील सर्वसामान्य जनतेची इच्छा होती. यापूर्वी या पदावर भाजपने कै. प्रमोद महाजन, अरुण जेटली यांची निवड केली होती. तेव्हा एवढा गहजब झाला नव्हता. नरेंद्र मोदी यांचे नाव फक्त पक्षाचे प्रचारप्रमुख अध्यक्ष म्हणून जाहीर झाले, तरी सबंध देशभर आनंदोत्सव साजरा केला गेला. नेमके याच वेळी भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपच्या ३ समित्यांचे राजीनामे दिले. अडवाणी यांनी भाजपचा राजीनामा दिलेला नव्हता. वास्तविक नरेंद्र मोदी यांची निवड व अडवाणी यांनी त्याचवेळी दिलेला राजीनामा हा निव्वळ योगायोग म्हणावा लागेल. आजमितीला आवाहन स्वीकारणार्‍या, निस्वार्थि, विकासपुरुष, पारदर्शी, कारभार करणार्‍या धडाकेबाज नेत्याची देशाला गरज आहे. प्रत्यक्ष कृतीमधून गुजरात राज्यात नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या माध्यमातून हे सिद्ध केले आहे. त्याकरिता कोणाच्या दाखल्याी किंवा पुराव्याची त्यांना गरज नाही. राज्यात गेले असता आपणा सर्वांना त्याची प्रचीती येते. शासकीय निधी व योजनांची तत्परतेने व पारदर्शीपणे अंमलबजावणी केल्यामुळे तसेच जल, जमीन, जंगल यांचे संरक्षण व संतुलन राखण्यावर सतत भर दिल्यामुळे त्यांना हे शक्या झाले आहे. शासकीय कामांमधे जितकी जास्त दिरन्गाई तितका जास्त भ्रष्टाचार; परंतु नरेंद्र मोदी यांनी कोणताही महत्वाचा निर्णय किंवा फाईल मंजुरी २४ तासाच्या आत घेणे बंधनकारक केल्यामुळे गुजरात राज्य आजमितीय प्रगतीपथावर आहे. विजेच्या त्रिस्तरिय वितरण पद्धत व १०० टक्के वीज चोरीला आळा घातल्यामुळे तेथे वीज भारनियमन नाही. सर्व नद्यांवर संपूर्ण गुजरातमधे चेक डॅम बांधल्यामुळे नद्यांचे पाणी वाहून न जाता जमिनीमधे मुरले जात आहे. परिणामी पूर्वीपेक्षा जमिनीमधील जलस्तर प्रचंड वाढला अहे.जगप्रसिद्ध नर्मदा प्रकल्पामुळे एकेकाळी वाळवंट असलेला कच्छचा भूभाग आता सुजलाम् सुफलाम्झाला आहे. तेथील जिरे दूध व दुग्धजन्य पदार्थ, शेती उत्पादने देश-विदेशात जात आहे. उद्योगधंदे, व्यवसाय व शेतीच्या भरभराटीमुळे अनेक रोजगाराच्या संधी भारतामधे हात जोडुन उभ्या आहेत. विशेष म्हणजे गुजरात राज्यात आपली काही पिळवणूक, अडवणूक, अन्याय होत असेल, तर मोदी यांना फोन करता येतो. यावरच न थांबता पुढील २४ तासात त्यावर सकारात्मक कार्यवाही होते. आज भारतामधून आयपीएस व आयएएस परीक्षा उत्तीर्ण झालेले युवक नोकरीकरता प्रथम प्राधान्य गुजरातला देतात. दिल्ली येथे राजीव गांधी फाउंडेशन ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या अध्यक्ष सोनिया गांधी आहेत. या संस्थेचे उच्च वरिष्ठ अधिकारी सदस्य आहेत. दरवर्षी देशभर आढावा घेऊन, विविध कसोट्या लाऊन देशात उत्कृष्ट कार्यक्षमतेचा पुरस्कार एका राज्याला दिला जातो. दरवर्षी हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना मिळतो. यावरून हे सिद्ध झाले आहे की, विकास पुरूष म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव अग्रभागी आहे. सतत नकारत्मेकतेमधुन पहिल्यामुळेच पुन्हा पुन्हा ग्रोधा हत्याकांडाचे भूत उकरुन त्याचा दोष विरोधक नरेंद्र मोदी यांना देतात; परंतु जर अगोदर कारसेवकांना रेलवेच्या डब्यात जाळले नसते, तर पुढील उद्रेक झालाच नसता. गुजरातमधे जितक्या दंगली व विध्वंस झाला त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मोठ्या दुर्घटना इतर राज्यांमधे झाल्या. त्याचा विचार न करता केवळ मोदी विरोध म्हणूम विरोधक सतत गरळ ओकतात. हे दुर्दैवी अयोग्या आहे. विरोधकांनीसुद्धा चांगल्याला चांगले म्हणण्याची दानत ठेवलीच पाहिजे. अटलजीच्या कार्यकाळात देशाने योग्या दिशेने पावले टाकण्यास सुरूवातकेली होती. रस्ते चतुष्कोन योजना, राष्ट्रीय महामार्ग, नद्या जोड प्रकल्प, अणू सज्जता, जिंकलेले कर्गील युद्ध, वेगाने पुढे जाणारा विकासदार, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन, यशस्वी अणुस्फोट चाचणी इ. अनेक चांगल्या कामांमुळे हा कार्यकाल देशाने सुवर्णकाळ म्हणून अनुभवला होता. तोच वारसा पुढे न्यायचा असेल, तर आज देशाला नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाची गरज अहे.जन्तेच कौलसुद्धा नरेंद्र मोदी यांच्याच बाजूने आहे हे सांगण्याला कोणा ज्योतिषाची गरज नाही.

 
   
Copyright © sunilkedar.com . All Right reserved Designed & Hosted by www.nashikfocus.com