नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाची देशाला गरज
 

गुजरात राज्याचे देशातले सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची नुकतीच भारतीय जनता पक्षाच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. गोवा येथे भाजप कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीला व त्या नंतरच्या सभेला उपस्थीतीचा उत्साह इतका अमाप होता की भाजपच्या आगामी २०१४ साली होणार्‍या लोकसभा निवडणूकांकरिता त्यांचे नाव पुढील पंतप्रधानपदाकरता जाहीर करावे, असा मतप्रवाह होता. हा मतप्रहाव फक्त गोव्यातच होता असे नाही तर संपूर्ण देशभरातील सर्वसामान्य जनतेची इच्छा होती. यापूर्वी या पदावर भाजपने कै. प्रमोद महाजन, अरुण जेटली यांची निवड केली होती. तेव्हा एवढा गहजब झाला नव्हता. नरेंद्र मोदी यांचे नाव फक्त पक्षाचे प्रचारप्रमुख अध्यक्ष म्हणून जाहीर झाले, तरी सबंध देशभर आनंदोत्सव साजरा केला गेला. नेमके याच वेळी भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपच्या ३ समित्यांचे राजीनामे दिले. अडवाणी यांनी भाजपचा राजीनामा दिलेला नव्हता. वास्तविक नरेंद्र मोदी यांची निवड व अडवाणी यांनी त्याचवेळी दिलेला राजीनामा हा निव्वळ योगायोग म्हणावा लागेल. आजमितीला आवाहन स्वीकारणार्‍या, निस्वार्थि, विकासपुरुष, पारदर्शी, कारभार करणार्‍या धडाकेबाज नेत्याची देशाला गरज आहे. प्रत्यक्ष कृतीमधून गुजरात राज्यात नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या माध्यमातून हे सिद्ध केले आहे. त्याकरिता कोणाच्या दाखल्याी किंवा पुराव्याची त्यांना गरज नाही

 
   
Copyright © sunilkedar.com . All Right reserved Designed & Hosted by www.nashikfocus.com