नाशिक भाजपचे पदाधिकारी गुजरातमधे तळ ठोकून
दिव्य मराठी नाशिक, सोमवार, 10 डिसेंबर 2012
 

उत्तर महाराष्ट्रातून गुजरातेत स्थायिक झालेल्यांना करणार आकर्षित

गुजरात विधानसभेच्या आगामी पंचवार्षिक निवडणूकीतील प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून पदाधिकारी सरसावले आहेत. त्यात नाशिक जिल्ह्याच्या सिमरेषेवर असलेल्या गुजरातमधील नवसारी, धरमपुर, डांग, बलसाड, सुरत विधानसभा क्षेत्रासाठी शहरातूनपदाधिकारी रवाना झाले आहेत.

निवडणुकींच्या तारखा जाहीर होण्यागोदरच म्हणजेच गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून नाशिक शहरातून पदाधिकारी या वियामध्ये भाजप सरचिटणीस नितीन वानखेडे, सुनील केदार यांचा समावेश असून हे दोन्ही पदाधिकारी नवसारी व धरमपुर मतदारसंघात तळ ठोकून आहेत. तर उर्वरित पदाधिकार्‍यांमधे शहराध्यक्ष, माजी शहराध्यक्ष, सरचिटणीस, प्रांतिक सदसया, काही लोकप्रतिनिधी तसेच, खासदार देखील वेळ मिळेल व पक्षश्रेष्टीकडुन जसे आदेश येतील, त्याप्रमाणे प्रचारासाठी जाणार असल्याचे सांगण्यात आले. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीतील पदाधिकार्‍यांकडून महाराष्ट्रातील विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगांव, नंदुरबार या चारही जिल्ह्यातील मराठी भाषिकांची संख्या गुजरातमधे लक्षणीय आहे. या मतदारांना आकर्षित करण्यासाठीया जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांना निमंत्रित करण्यात आले असून त्यांच्या नातेगोथयांशी भेटीगाठी घेतल्या जात आहे.

गुजरातमधे निवडणुकीचा प्रचार करण्याचा अनुभव असलेल्या भाजपच्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती यावेळी करण्यात आली आहे. पंचवटींचे मंडळ अध्यक्ष सुनील केदार यांना गुजरातमधील तीन चार निवडणुकींच्या प्रचाराला जाण्याचा अनुभव असल्याने त्यांची महत्वाच्या ठिकाणी निवड करण्यात आली आहे.धानसभा मतदारसंघात संपर्क ठेऊन आहेत.

 
   
Copyright © sunilkedar.com . All Right reserved Designed & Hosted by www.nashikfocus.com