ऊस तोड नियोजनाबाबत फेरविचार गरजेचा
मंगळवार, २२ मार्च २०११
 

महाराष्ट्रात सध्या सर्वच कारखान्यांचा ऊसतोडीचा प्रश्न भेडसावत आहे. सर्व राज्यात ऊसतोडीअभावी ऊस शिल्लक राहील की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रोग्रॅमनुसार ऊसतोड उशिरा होत आहे. ऊसतोड मजूर मुजोर झाले असून त्यांना विनंती केली जात आहेत. अवकाळी पाऊस हा ऊस उत्पादक शेतकर्‍याना शाप तर ऊसतोड मजुरांना वरदान ठरला आहे. कारण परभणी, बीड, मराठवाडा, विदर्भ या भागातील शेतजमिनींना व चांगल्या पाउसामुळे विहिरींना पाणी आल्यामुळे  ज्या ऊसतोड शेतकर्‍याकडे जमिनी आहेत ते शितिकडे वळले आहे. तसेच ऊसतोड . सुधा दिवसेंदिवस कमी होत चालले आहे ऊसतोड हा अतिशय श्रामाचा झाल्यामुळे मजूर सोप्या कमांकडे वळला आहे.

तथापि ऊसतोडीचे नियोजन भविष्यात बदलणे ही आत्ता काळाची गरज झाली असून आता ऊसतोड मशिणरी तयार होत आहेत. महाराष्ट्रात सर्वप्रथम वारणा कारखान्याने स्वमालकीचा ऊसतोड मशिणरी खरेदी केली आहे. ज्या भागातील ऊस उत्पादक शेतकर्‍यानि ४ फूट किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावर ऊस लागवड करत आहे. कारण जर तुटलेल्या ऊसाच्या शिल्लक क्षेत्राचे नुकसान होऊ नये तर ऊस लागवड ही ऊसतोड मशिणरीच्या पध्दतीनुसार केली पाहिजे. यापुढे भविष्यात जे कारखाने ऊसतोड नियोजन  आधुनिक पध्दतीने करतील तसेच जे शेतकरी कारखान्यांनी ऊस तोडला नाही तरी स्वखर्चाने स्वतःच ऊस तोडून कारखान्यांना देतील, अशा उस उत्पादक शेतकार्‍याना भविष्यात ऊसाचा प्रश्न भेडसावणार नाही.

दौंड तालुक्यात पाटस येथील इंजिनीयर शेतकरी असलेले राजे पती-पत्नी यांनी स्वत:चा ७५ एकर ऊस स्वत:च ऊसतोड मशिणरी तयार करून तोडला आहे. त्याचे प्रात्यक्षिकसुद्धा त्यांनी महाराष्ट्रातील सर्व साखर कारखाना प्रतिनिधींना बोलावून दाखविले आहे. वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटने या राणे उद्योग व शेती समूहाला सहकार्य, मदत व मार्गदर्शन केले आहे. दुसरीकडे काही साखर कारखाने मजूर भारती न करता शेतकर्‍यानाच ऊस देण्यास सांगात आहेत. त्याप्रमाणे काही कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकरी ऊस देत आहेत. हे एका दृष्टीने ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखान्याच्या फायद्याचेच आहे. कारण ऊसतोड कामगार आगोदर कारखान्यांकडून अडवांस घेतात व बरेचसे कामगार ऊसतोडिस न येता पैसे बुडवतात. त्यांच्यावर कारवाई हा नंतर फार्स ठरतो. परिणामी कारखान्यांचे दुहेरी नुकसान होते. यावर दिंडोरी-पेठ भागातील करंजाळी/पेठ परिसरातील ऊस उत्पादक शेतकर्‍यानी नामी उपाय शोधला असून ऊस उत्पादक शेतकरीच आता एकत्र येऊन गटागटाने स्वतःच ऊस तोडून कादवा साखर कारखान्यास देत आहेत. एका शेतकर्‍याचा ऊस तोडला की, हे शेतकरी गटागटाने इतर शेतकर्‍याच्या क्षेत्रात ऊसतोड करतात.

परिणामी ऊस वेळेवर तोडला जातो व गटसमुह शेती पध्दतीला प्रोत्साहन मिळत आहे. यापुढे दोनच पर्याय साखर कारखाने व ऊस उत्पादक शेतकर्‍यापुढे आहेत. एक तर आधुनिक मशिणरीच्या पध्दतीने ऊस लागवड करणे, तशाप्रकारे कार्यक्षेत्रात मशिनरिचि उपलब्धता करणी व वेळेवर ऊसतोड करणे, दुसरा पर्याय शेतकर्‍यानी स्वतःच्याच जबाबदारीवर ऊस तोडून कारखान्यांना पूरवावा. भविष्यात सर्वच क्षेत्रातील मजूर हे कमी श्रमात जास्त मोबदला मिळविण्याच्या मागे लागले असून आधुनिक मशिनरीमुळे श्रमाचे मोल कमी होत चालले आहे. पुर्वी जे शेत कामगार ग्रामीण भागात मुबलक मिळत तेच कामगार आता शहरांमधे रस्त्या-रस्त्यांवर गटागटाने येऊन राहतात व त्यांना चढ्या मजुरीने काम द्यायला शहरातील बिल्डर, उद्योजक, व्यापारी तयार होतात. ही परिस्थिती नाशिक शहरातील चौकाचौकात पाहायला मिळते.
आम्ही या कामगरांकडे खेड्यात गटागटाने ऊस तोडण्यास चला म्हणून भेट घेतली असता त्यांनी नकार दिला. त्यांना कारण विचारले असता, आम्हाला शहरात कमी श्रमात जास्त मोबदला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आठवड्यात दोन ते तीन दिवस कामधंदा नाही मिळाला तरी आमचे भागते, असे त्यांनी सांगितले.

या सर्व पार्श्वभूमीवर भविष्यात ऊसउत्पादक शेतकरी यांना गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली असून भविष्याचा वेध घेऊनच आपली शेती करावी लागणार आहे. ऊसतोडीचा गंभीर प्रश्न लक्षात घेता आत्ता साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकर्‍यानी एकत्र येऊन ऊसतोड मशिणरी व सामूहिक गटागटाने ऊसतोड पध्दतीचा अवलंब अशा दोन्ही गोष्टी केल्यास मोठ्या प्रमाणात ऊसतोडीचा प्रश्न निकालि निघेल, यापेक्षा दुसरा पर्यायच आता ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखान्यांपुढे राहिला नसून भविष्यात ऊसतोड मजूर हे वाढवण्याऐवजी कमी कमी होत जाणार हे निर्विवाद सत्य आहे.

 
   
Copyright © sunilkedar.com . All Right reserved Designed & Hosted by www.nashikfocus.com